भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला' ही कादंबरी स्वतःचे असे वेगळेच प्रभावीपण सिद्ध करणारी आहे. आजच्या काळाचे प्रतिबिंब तिच्यात पुरेपूर उतरले असून ती केवळ एखाद्या तात्कालिक समस्येला हाताळत नाही. कादंबरीच्या आवक्याला पुरेल असाच एक मोठा विषय उकलण्याचा प्रयत्न तिच्यातून लेखकाने केला आहे. कादंबरीत महत्त्व आहे ते पांडुरंग सांगवीकरच्या जीवनाबद्दलच्या काही कटू पण वास्तव जाणिवा कशा हळूहळू उमगत आहेत याला. त्याला आयुष्याच्या सगळ्या धडपडीचा अर्थ अखेरच्या तडजोडीच्या क्षणांमध्ये उमगतो तो इतकाच की, आपल्यासारख्यांचा जीवनक्रम जन्माला येण्यापूर्वीच समाजाने ठरवून दिलेला आहे. अशा काही गोष्टी आहेत की, त्यातून सामान्य माणसाची सुटकाच होऊ शकत नाही. मरण्यापूर्वी काय काय प्राप्त कर्तव्ये आहेत, तीही जणू नेमून दिलेली आहेत. या आखीव मार्गातून जे सुटतात, त्यांना जे काही वेगळे उमगेल ते उमगेल; पण पांडुरंग सांगवीकरला घाण्याचा बैल झाले पाहिजे. तरीही पांडुरंग सांगवीकरचा वाचकांवर प्रभाव पडतो, तो निव्वळ घाण्याचा बैल वाटू शकत नाही. कारण बैल असू नये यासाठी तो सुरुवातीपासून तळमळत असतो आणि त्या तळमळीमुळे तो कधीही तिरस्करणीय होऊ शकत